लिटील फ्लावर नर्सरीमध्ये रंगला पालखी सोहळा

पिंपरी – रहाटणी येथील लिटील फ्लावर नर्सरी स्कुलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानोबा माऊली, तुकाराम, या जयघोषाने परिसर आनंदी व भक्तिमय झाला होता.

वारकऱ्यांचा पेहराव करत विद्यार्थी सोहळ्यात सहभागी झाले होते. गळ्यात तुळशी माळ, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ, मृदुंग तर मुलीच्या डोक्‍यावर तुळशी वृंदावन व मुखातून ज्ञानोबा-तुकोबाच्या नावाचा जयघोष यामुळे शाळेचा सर्व परिसर भक्तिमय झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वारकरी व विठ्ठल-रुक्‍मिणीचा वेष परिधान केलेले चिमुकले लक्ष वेधून घेत होते. मुख्याध्यापिका अनिता जांभळे यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीता सोनवणे, शिल्पा पंडित, वैशाली चौधरी, सुरेखा गायकवाड, शीला झोडगे व उज्ज्वला ढवळे आदी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)