‘लाल वादळ’ स्थगित; गिरीश महाजन यांची शिष्टाई यशस्वी

नाशिक – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लेखी आश्वासन दिल्याने नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला ‘किसान लॉंग मार्च’ स्थगित करण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभेचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावल यांच्यात चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मोर्चाची कोंडी फुटली.

किसान सभेच्या प्रतिनिधींनी सरकारपुढे आपल्या विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत या बैठकीची तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, असे महाजन यांनी नमूद केले. वन हक्क जमिनीचे दावे येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्यात येतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या आश्वासनाने आंदोलकांचे समाधान झाल्याचे सांगितले. यावेळी आंदोलक प्रतिनिधीही उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.