लालू व कुटुंबियांना दिल्ली कोर्टाचे समन्स

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरण
नवी दिल्ली – रेल्वेच्या आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या कोर्टाने राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, पुत्र तेजस्वी यादव यांना समन्स पाठवले आहेत. त्यांना 31 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आयआरसीटीसीची दोन कंत्राटे खासगी कंपन्यांना देण्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला असून त्यासंबंधीच्या खटल्यात हे समन्स जारी करण्यात आले आहे. सीबीआयने त्यांच्या विरोधात हे आरोप पत्र गेल्या 16 एप्रिल रोजी दाखल केले आहे. आरोपींच्या विरोधात खटला चालवण्यास सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणात लालू व त्यांच्या कुटुंबियांखेरीज माजी केंद्रीय मंत्री प्रेमचंद गुप्ता, त्यांच्या पत्नी सरला गुप्ता, बी के आगरवाल, आयआरसीटीसीचे तत्कालिन संचालक राकेश सक्‍सेना हेही आरोपी आहेत. ही कंत्राटे मिळवणाऱ्या सुजाता हॉटेल्स आणि चाणक्‍य हॉटेलचे मालकही या प्रकरणात आरोपी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)