लालूप्रसाद यादव यांची आणखी एक संपत्ती जप्त

पटना : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या चारा घोटाळा प्रकरणात सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. मात्र असे असले तरी आता आयकर विभागाने त्यांच्यावर वक्रदृष्टी केली असल्याचे दिसत आहे. कारण आयकर विभागाने त्यांची आणखी एक संपत्ती जप्त केली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या परिवारावर अगोदरच सीबीआयच्या चौकशीची टांगती तलवार आहे. त्यातच आता आयकर विभागाने ही कारवाई केल्याने यादव परिवारासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पटनामधील विमानतळाजवळील केंद्रीय विद्यालयासमोर असणारे यादव यांच्या मालकीचे एक मोठे भवन विभागाने जप्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या भवनावर बेहिशेबी संपत्ती कायद्याअंतर्गत  कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान, ही जमीन फेयरग्रो प्राइवेट लिमिटेड या बनावट कंपनीच्या नावावर या भवनाची जमीन असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळेच या संपत्तीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे लालूप्रसाद यादव याचे कुटुंबीय आणखी गोत्यात आल्याचे बोलले जात आहे.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)