लायन्स क्‍लबचे उपक्रम कौतुकास्पद

महाबळेश्वर ः पदग्रहण समारंभप्रसंगी ला. किरण जाधव, ला. मनीषा कोमटी, ला. राहुल शिंदे, ला. राज साळुंखे आदी मान्यवर.

महाबळेश्वर, दि.31 (प्रतिनिधी) – आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने महाबळेश्वर लायन्स व लायनेस क्‍लबने गेल्या वर्षभरामध्ये राबविलेले समाजोपयोगी कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यापुढे देखील समाजाची गरज ओळखून नूतन पधिकाऱ्यांनी आणखी जोमाने काम करावे लागेल. पाहिजे ते सहकार्य आमच्याकडून होईल, असे प्रतिपादन लायन्सचे डिस्ट्री. चेअरमन व्हिजन सेंटर ला. राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. लायन्सचे नूतन अध्यक्ष ला. किरण जाधव तर लायनेसच्या नूतन अध्यक्षा म्हणून लाय. मनीषा राकेश कोमटी यांचा पदग्रहण समारंभ ला. राहुल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे ला. राहुल शिंदे, ला. रवींद्र बेलगटकर, ला. राज साळुंखे, माजी अध्यक्ष ला. पंकज येवले, ला. वंदना पल्लोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाबळेश्वर लायनेस माजी अध्यक्षा व सदस्य कै. सविता प्रकाश पाटील व कै. कविता विशाल तोष्णीवाल यांचे काहीच दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या दोघीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मागील वर्षीचा सेवा कार्याचा अहवाल ला. सुमेधा राजगुरू यांनी उपस्थितांसमोर मांडला. ला.पंकज येवले व ला. वंदना पल्लोड यांनी आपली मनोगते व्यक्त केली. ला. राहुल शिंदे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे ला. राहुल शिंदे, ला. राज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्सचे नूतन अध्यक्ष म्हणून ला. किरण जाधव तर लायनेसच्या नूतन अध्यक्षा म्हणून ला. मनीषा कोमटी यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. अनघा कोमटी यांनी आभार मानले. यावेळी सातारा येथील अतुल उभाळे, तुषार माने यांच्यासह येथील लायन्सचे सूर्यकांत शिंदे, महेश कोमटी, सुनील कोमटी, रियाज सय्यद लायनेसच्या चित्रा पल्लोड, वंदना कोमटी, नमिता कोमटी, सुचेता रांदड, सुरेखा देवकर, विदुला जोशी आदी उपस्थित होत्या.

महाबळेश्‍वर ः ला. राहुल शिंदे,ला. राज साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्सचे नूतन अध्यक्ष म्हणून ला. किरण जाधव तर लायनेसच्या नूतन अध्यक्षा म्हणून ला. मनीषा कोमटी यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)