लाडक्या लेकीला सनीने दिले खास गिफ्ट

आपल्या कामातून वेळ काढून तिन्ही मुलांचा सांभाळ करत त्यांच्या संगोपनाकडेही सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल जातीने लक्ष देत आहेत. प्रत्येक लहान गोष्टीतून ते आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू खुलवत आहे. असंख्य क्रिस्टल्सचा वापर करत सनीने आपल्या लाडक्या मुलीसाठी म्हणजेच निशासाठी एक सुरेख अशी कलाकृती तयार केली आहे.

ज्यामध्ये तिने अगदी लहान अशा क्रिस्टल्सच्या मदतीने काही पक्षांचं चित्रं तयार केलं आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने ही कलाकृती तयार झाली असून ती निशासाठी असल्याचं सर्वांना सांगितलं. ‘गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी केलेली पोस्ट आठवतेय का? जवळपास ७ महिन्यांपूर्वी मी या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली होती. हजारो क्रिस्टल्सचा वापर करत मी ही भेटवस्तू खास निशासाठी तयार केली आहे. माझा विश्वासच बसत नाहीये की ही कलाकृती पूर्णपणे तयार झाली आहे’, असं तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/SunnyLeone/status/1001353186928660480

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)