लाच स्विकारताना कर्मचारी जाळ्यात

पिंपरी – इमारतीतील वीज कनेक्‍शन व मिटर हे ग्राहकांचे नावे करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कनिष्ठ कार्यालयीन सहाय्यकाला लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक केले आहे.

गजानन सुरेश यादव (वय-39) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. महावितरण कंपनीच्या एमएसईडीसी ताथवडे शाखेमध्ये ते कार्यरत आहेत. एका 26 वर्षीय व्यक्तिने तक्रार दिली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 27) करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बांधकाम व्यवसायिकाने इमारत विकसित केली आहे. त्या इमारती मधील वीज कनेक्‍शन व मीटर ग्राहकांच्या नावे करून देण्यासाठी गजानन यादव याने 10 हजार 400 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचून आज 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)