लाखमोलाचे सरकारी ऍप्स 

– महेश कोळी 
तांत्रिक क्रांतीच्या काळात स्मार्टनेसबाबत असा कोणताही ठोस फायदा सांगता येत नाही. मात्र स्मार्ट तंत्रज्ञानाने हजारो नागरिकांचे काम अतिशय सोपे आणि रंजक केले आहे. स्मार्टफोन हे असे डिव्हाइस बनले आहे की, तेथे प्रत्येक काम करण्यासाठी विचार करण्यापूर्वीच ती बाब आपल्या स्क्रीनवर येते. आज वेगवान संवादाबरोबरच वेब सर्फिंगपर्यंत आणि मनोरंजनापासून शिक्षणापर्यंत सर्वकाही गोष्टी सोप्या झाल्या आहेत. या गोष्टींची आपण कधीही कल्पना केली नव्हती. हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे ऍप्स मदत करत आहेत.
आज गूगल प्ले स्टोर आणि ऍपल स्टोरमध्ये लाखो प्रमाणात ऍप्स उपलब्ध आहेत. त्यात आपण आपल्याला उपयुक्त ठरणारा ऍप निवडू शकतो. फोटो, व्हिडीओ, आरक्षण, ऑनलाइन स्टोर, पेमेंट सिस्टिम, डेटा ऍनालिसिस, पर्सनल असिस्टंट यासारखे असंख्य ऍप आपल्या सेवेला हजर असतात. ऍप्सचे वाढते महत्त्व लक्षात घेता सरकारने देखील सर्व नागरिकांना शिक्षण, सुरक्षा आणि व्यवस्थेशी निगडित ऍप्स विकसित केले आहेत. या सरकारी ऍपची माहिती जाणून घेऊ या. 
इन्क्रडेबल इंडिया: भारत सरकारच्या टूरिझम ऍप हा पर्यटनाशी निगडित सर्व माहिती उपलब्ध करून देतो. घरगुती आणि परदेशी पर्यटकांसाठी हा ऍप विकसित केला आहे. यात देशातंर्गत टूर ऑपरेटर, ट्रान्स्पोर्ट ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, स्थानिक पातळीवरील गाईड, निवडक शहरातील पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेलची माहिती देखील या ऍपवरून मिळते. 
आयआरसीटीसी : रेल कनेक्‍ट: आयआरसीटीसी रेल कनेक्‍ट हे भारत सरकारचे लोकप्रिय ऍपपैकी एक मानले जाते. या ऍपच्या माध्यमातून आपण ऑनलाइन आरक्षण करू शकतो. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि वेगवान व्यवहाराच्या सुविधेसाठी यात आयआरसीटीसी इ-व्हॉलेटची देखील सुविधा आहे. 
शेतकरी सुविधा ऍप: शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित असलेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी या ऍपची रचना करण्यात आली आहे. शेतकरी या ऍपच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज, बाजार मूल्य, पिकांचे संरक्षण आदींबाबत सविस्तर माहिती मिळवू शकतो. 
पोस्ट-इन्फो: सेंटर फॉर एक्‍सिलन्स इन पोस्ट टेक्‍नॉलॉजीकडून विकसित केलेला हा ऍप टपाल खात्याने प्रसिद्ध केला आहे. या ऍपने आपण सहजपणे पार्सल ट्रॅकिंग, पोस्टेज कॅल्क्‍युलेटर, इन्शूरन्स हप्ता कॅल्क्‍युलेटरचा लाभ घेऊ शकतो. या ऍपमध्ये टपाल खात्याच्या विमा योजनेची देखील माहिती मिळवू शकतो. 
इंडियन पोलीस ऑन कॉल ऍप: हा हॅप इन्स्टॉल केल्यानंतर नजिकच्या पोलीस स्टेशनला सहजपणे लोकेट करू शकतो. पोलीस ठाण्यापर्यंत जाण्याचा मार्ग देखील हा दाखवतो आणि अंतरही सांगेल. याशिवाय डिस्ट्रिट कंट्रोल रूम आणि एसपी ऑफिसचा नंबर देखील या ऍपवर उपलब्ध असेल. 
एम-आधार ऍप: यूआयडीएआयकडून अँड्रॉइड यूजरसाठी जारी केलेला एम-आधार ऍप हा बहुपयोगी ऍप आहे. यात आपण आधारशी निगडित असलेली माहिती मोबाइलमध्ये ठेऊ शकतो. यात आपण कोणत्याही सेवा संस्थेला इ-केवायसीसंदर्भातील माहिती देऊ शकतो. क्‍यूआर कोडच्या मदतीने आणि आधार प्रोफाईल पाहू शकतो. 
एम-कवच: मोबाइल सिक्‍युरिटी सोल्युशन्स: मोबाइल फोनशी निगडित सुरक्षेची चिंता दूर करण्यासाठी या ऍपची रचना करण्यात आली आहे. अँड्रॉईड डिव्हाइसवर चालणाऱ्या या ऍपच्या माध्यमातून आपण स्मॅम एसएमएस आणि इच्छा नसलेले कॉल, ब्लॅंक कॉलला ब्लॉक करू शकतो. या माध्यमातून आपण मालवेअर संबंधित माहिती देखील मिळवू शकता. पर्सनल डेटा आणि सिक्‍युरिटीसाठी हा ऍप फायदेशीर आहे. 
डिजी लॉकर ऍप: भारत सरकारने एखाद्या व्यक्तीचे सर्व कागदपत्रे एकत्र राहण्याच्या दृष्टीने डिजीलॉकर विकसित केले आहे. यामुळे आपल्याला कोणतीही हार्ड कॉपी जवळ बाळगण्याची गरज नाही. जर आपल्याकडून सिग्नल मोडला गेला तर वाहतूक पोलिसाला डिजी लॉकरच्या मदतीने लायन्सन दाखवू शकतो. या ऍपमध्ये आधार, पॅनकार्ड, गॅस कनेक्‍शन, गाडीचे आरसी बूक, आधार नंबर हा आहे त्या स्वरूपात स्टोअर राहते. डिजीलॉकरचा आणखी एक फायदा असा की, जर आपण लायसन किंवा पॅनकार्ड हरवले तर द्वितीय प्रत मिळवण्यासाठी डिजीलॉकर मोलाचे साह्य करते. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)