लाखणगावात राष्ट्रवादीचे वर्चस्व

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍यातील लाखणगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेकडे असलेली ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसने खेचुन आणली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीच्या प्राजक्ता शिरीषकुमार रोडे सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
शिवसेना पुरस्कृत कुलस्वामी सटवाई देवी ग्रामविकास तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाई देवी माता-सटवाजीबाबा ग्रामविकास या दोन पॅनलमध्ये सरळ लढत होती. सरपंच पदासाठी प्राजक्ता शिरीषकुमार रोडे तर शिवसेनेकडून आशा संदीप मिंडे व अपक्ष मीनाक्षी ज्ञानेश्‍वर रोडे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मागील अनेक वर्षांपासून याठिकाणी शिवसेनेची सत्ता होती. मात्र, यावर्षी राष्ट्रवादीला सत्ता परिवर्तन करण्यात यश आले. लाखणगाव ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – दस्तगीर अजुमुद्दीम मुजावर, अर्चना संतोष दौंड, मार्तंड तुकाराम टाव्हरे, प्रमोद प्रकाश भागवत, बाळासाहेब फकिरा धरम, साधना रवींद्र अरगडे, दिपाली संतोष वाघमारे, सुवर्णा संदीप पडवळ, वंदना नवनाथ पडवळ.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)