लहुजी साळवे, वासुदेव फडके यांना महापालिकेचे अभिवादन

पिंपरी –लहूजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. चिंचवड स्टेशन येथील या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यास रविवारी (दि.17) महापौर राहुल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्‍त अण्णा बोदडे, प्रशासनन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे युवराज दाखले, सुरेश जोगदंड, सागर गायकवाड, विशाल कसबे, मनोहर वाघमारे आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)