पुणे,दि.3 व्ययस्कर हॉटेल चालकाच्या डोक्यात दोन ग्राहकांनी वाद झाल्यानंतर हातोडा मारला. या घटनेत हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना लष्कर परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले, हॉटेल चालक रविंद्र अग्रवाल यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्यात हातोडा मारण्यात आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना मारहाण करणारे दोघेही हॉटेलचे नियमीत ग्राहक आहेत. बुधवारीही ते दोघे आठच्या सुमारास हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. हा वाद सोडवण्यासाठी अगरवाल मधी पडले होते. यावेळी एकाने तीन वेळा अगरवाल यांच्या डोक्यात हातोडा मारला. आरोपी व हॉटेल कर्मचाऱ्यांच्या भांडणाचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यानूसार पोलीस आरोपींचा माग काढत आहेत. त्या दोघांविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.