लवकरच रेल्वेच्या ऍपवर तुमचे आवडते कार्यक्रम मोफत मिळणार

File photo..

नवी दिल्ली : रेल्वेच्या प्रवाशांसाठी लवकरच रेल्वेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मोफत ऍपमुळे रेकॉर्ड केलेले कार्यक्रम पाहता येणार आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम रेल्वे बोर्डाने रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. आवडत्या हिंदी मालिका असोत वा रात्री वृत्तवाहिनींवरून प्रसारित होणाऱ्या चर्चा त्या गोष्टी रेल्वे प्रवाशांना पाहता येतील. या ऍपच्या वापरामुळे रेल्वेला जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळण्याची शक्‍यता आहे.

देशभरातील 1600 रेल्वेस्थानकांवर याआधीच वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उर्वरित 4700 स्थानकांवर हे काम येत्या ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण होईल. या ऍपच्या माध्यमातून मोबाईलवर विविध दूरचित्रवाहिन्यांच्या मालिका, चित्रपट, गाणी, आध्यात्मिक कार्यक्रम, बातम्या, विविध घडामोडींवर वृत्तवाहिन्यांवरून होणाजया चर्चा हे सारे काही रेल्वे प्रवाशांना पाहता येईल. हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी झोनल रेल्वे विभागांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांना ती पेलता न आल्याने आता ते काम रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. तशी माहिती रेल्वे बोर्डाने 11 जुलै रोजी काढलेल्या एका आदेशात देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)