लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय महाराष्ट्राची महती सांगणारं गीत…”माझा महाराष्ट्र”

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे “माझा महाराष्ट्र” हे गीत होय. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. ज्यात साधना सरगम, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध साउंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते असून शांतनू रोडे यांनी या गीताचे दिग्दर्शन केले आहे. या गीताचे छायांकन आशुतोष आपटे यांचे आहे, तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले आहे. 

मूळचे नागपूरचे असलेले अभिजीत जोशी यांनी याआधी अनेक मराठी सिनेमांसाठी गीतकार- संगीतकार म्हणून काम केले आहे. यामध्ये “हरी ओम विठ्ठला”, “अगडबंब”, “कामापुरता विमा”, “सुपारी पालखी”, “जयजयकार”, “लक्ष्मी येई घरा”, “हर हर महादेव” या चित्रपटांचा समावेश आहे. शंभरहुन अधिक अल्बम्स, जिंगल्स आणि चित्रपट मिळून तीनशेहुन अधिक गाणी अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे. सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांबरोबर अभिजीत यांनी काम केले आहे. शासनाच्या अनेक योजनांवर आधारित गाणीही अभिजीत यांच्या नावावर आहे. मा. मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अमृता फडणवीस यांचा समावेश असलेले “रिव्हर मार्च” हे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले गाणेदेखील अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
73 :cry:
103 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)