लढत दोन दलबदलूंमध्ये!

पश्‍चिम बंगालच्या सीमेलगत असणाऱ्या कूच बिहार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची असणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन्हीही पक्षांनी दलबदलू उमेदवारांना तिकिट दिले आहे. तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार परेश चंद्र अधिकारी हे पक्ष बदलून ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत.

भाजपाचे उमेदवार नीतीश प्रामाणिक हे दोन महिन्यांपूर्वी तृणमूल युवा कॉंग्रेसचे नेते होते. या मतदारसंघातून तृणमूल युवा कॉंग्रेस, भाजपा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि कॉंग्रेससह 11 उमेदवार रिंगणात आहेत. पण मुख्य लढत ही तृणमूल आणि भाजपामध्येच आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.