लग्नसमारंभात चोरी करणारी सहा जणांची टोळी शिर्डीत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई ; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर: लग्नाची घाईगडबडीत वधू-वराकडील नातेवाइकांची एकच धावपळ सुरू असते. शेकडो-हजारोंचा जनसमुदाय आशीर्वाद देण्यासाठी जमलेला असतो. त्यातच लग्नात दागिन्यांची चोरी होते. शुभ आशीर्वादाला नजर लागते. आनंदावर विरजन पडते. अनेकांचा चेहरे पडतात. चोराने त्याचा कार्यभाग साधलेला असतो. अशाचपद्धतीने लग्न कार्यात चोरी करणारी प्रशिक्षित, अशी परप्रांतीय टोळी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केली आहे. दिलीप मानसिंग सिसोदीया (वय 30), नवीन प्रेमनारायण भानेरिया (वय 32), मोहनसिंग गोपालसिंग सिसोदीया, (वय 22), प्रदीप मानसिंग सिसोदीया (वय 28), आशिषकुमार अनूपसिंग छायन (वय 20), अभिषेक विनोद सिसोदीया (वय 20, रा. कडीया, ता. पचौर, जि.राजगड, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीकडून 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन मोटारगाडीमधून ही टोळी तलवारी, दांडके सोबत घेवून दरोडा टाकण्यासाठी मनमाड-नगर रोडने शिर्डीच्या दिशेने निघाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्याकडून या टोळीची माहिती मिळाली. मनमाड-नगर रोडवरील शिर्डी येतील निघोज फाटा, बायपास चौकात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा लावला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही टोळी येताच सापळा आवळण्यात आला आणि या सहाजणांना ताब्यात घेण्यात आले. मोटारगाडीसह तलवार, सत्तूर, चार लाकडी दांडके, मोबाईल, 6 तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या असा एकूण 10 लाख 1 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे विशाल अशोक दळवी यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी दिली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यामधील लग्न समारंभामध्ये घुसून ही टोळी चोऱ्या करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. शिर्डी येथे 30 डिसेंबरला लग्न समारंभामध्ये 55 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे या टोळीने चौकशीत माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)