लक्ष्मण जगताप 5000 मतांनी आघाडीवर

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदार संघात दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप 5000 मतांनी आघाडीवर आहेत.

चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात काँटे की टक्कर आहे. त्यांच्यासह 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा हा मतदार संघ आहे. याठिकाणी 2 लाख 76 हजार 669 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदानाची ही टक्केवारी 53.38 आहे. या मतदार संघात 491 मतदान केंद्र असून 22 टेबलवर मतमोजणीच्या एकूण 23 फेर्‍या होणार आहेत.

राहुल कलाटे हे जगताप यांना जोरदार टक्कर देत असल्याचे पहायला मिळत आहे. दुसऱ्या फेरीअखेर जगताप यांना 12 हजार 229 तर कलाटे यांना 10 हजार 429 मते मिळाली आहेत. फेरीनिहाय जगताप यांची आघाडी वाढत चालली आहे. पाचव्या फेरीअखेर जगताप यांना 33 हजार 458 तर कलाटे यांना 27 हजार 677 मते मिळाली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)