लंडनवरून फोन करून मोदींनी दिला ‘या’ मुख्यमंत्र्यांना गुरुमंत्र

भोपाळ : न्यायाधीश लोया प्रकरणावरून देशात मागच्या काही दिवसात राजकारण करण्यात येत होते. आता या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात जुंपली असल्याचे दिसत आहे. यासाठी परदेश दौऱ्यावर  असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अप्रत्यक्षरित्या उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना लंडनवरून फोन करून चांगलाच गुरूमंत्र दिला असल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री शिवराज चौहान हे सिंगरौलीमध्ये एका सभेत भाषण करत होते. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला राज्यातील विकास आणि इतर मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली. मात्र अचानक शिवराज चौहान यांच्या भाषणातील मुद्दा बदलला आणि त्यांच्या बोलण्यात आक्रमकता आली त्याचे कारण ठरले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन. सुरुवातील चौहान यांनी पंतप्रधान मोदी यांचा फोन घेण्याची टाळाटाळ केली परंतु. हे एवढे सहज शक्य नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पंतप्रधानांशी बातचीत केली. त्यानंतर पुन्ह एकदा त्यांनी भाषणाला सुरुवात केली परंतु, त्यांच्या भाषाणाची भाषा बदलल्याचे उपस्थित सर्वांनाच जाणवले. यावेळी त्याच्या निशाण्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांनी उपस्थित केलेला न्या.लोया प्रकरण होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)