आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता हा विषय आज जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काही अभ्यासकांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा मोठे आव्हान या कृत्रिम बुद्धिमत्तेने उभे केले आहे. काहींच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात येणारे रोबो भविष्यात मानवजातच नष्ट करतील… असे असले तरी रोबोंचा वापर, निर्मिती काही थांबलेली नाही.
मध्यंतरी, सोफिया नामक यंत्रमानव महिलेला सौदी अरेबिया या देशाने नागरिकत्त्वच देऊ केले. जगभरात अशा यंत्रमानवांच्या निर्मितीचे काम जोरदार सुरू आहे. जपानसारख्या देशात सध्या प्रत्येक प्रकारचे काम “रोबो’ करत आहेत. हॉटेलमधील वेटरपासून ते बड्या कंपनीत रिसेप्शनिस्टपर्यंची जबाबदारी या रोबोंवर सोपवण्यात आली आहे. आता तर एका जपानी कंपनीने अंत्यसंस्कारावेळी पादरीची जबाबदारी पार पाडण्याचे काम चक्क रोबोवर सोपवली आहे. जपानमध्ये मरणे अत्यंत “महाग’ बनले आहे.
यामुळेच मृतांवर कमी खर्चात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, म्हणून रोबोवर अंत्यसंस्काराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “पेपर’ नावाचा एक रोबो तेथे बौद्ध भिख्यू बनला आहे. हा रोबो मंत्रोच्चाराचेही काम करत आहे. थोडक्यात काय, तर हा रोबो सध्या अंत्यसंस्कारावेळी पादरी जी जबाबदारी पार पाडत असतात, ती भूमिका रोबो पार पाडत आहे. बौद्ध रोबोट विकसित करणारी कंपनी “निसेई इका’ने कमी खर्चात अंत्यसंस्कार करण्याचा हा पऱ्याय शोधून काढला आहे.
एखादी व्यक्ती जर मृत्यू पावली, तर तिच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन शोधण्यापासून ते पादरीला बोलावण्यासाठी एकूण 5 लाख रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठीच “निसेई इका’ या कंपनीने “रोबोकरवी अंत्यसंस्कार’ ही कल्पना सत्यात उतरवली आहे. मध्यमवर्गाला नजरेसमोर ठेवूनच रोबोची ही कल्पना साकारण्यात आली आहे. रोबोकरवी अंत्यसंस्कार करण्यास 30 हजार रुपये खर्च येत आहे. तर पादरी यापेक्षा दुप्पट पैसे आकारतात
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा