रोप स्कीपिंगमध्ये भार्गव, नितीनचे यश

पुणे: भार्गव नितीन पाटील व शिवम नितीन पाटील ह्या दोघा भावंडांनी भोपाळ येथे इंडियन रोप स्कीपिंग महासंघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय रोप स्कीपिंग विजेतेपद स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना यशस्वी कामगिरी केली.

शिवमने 4 सुवर्ण व 1 रजत, तर भार्गवने 3 सुवर्ण व 5 रजतपदक जिंकले.

दोघांची निवड आता अमेरिकेत व्हर्जिनिया येथे जुलै 2020 मध्ये होणाऱ्या ज्युनिअर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तसेच मे 2020 मध्ये नेपाळ येथे होत असलेल्या आशियाई रोप स्कीपिंग स्पर्धेसाठी झाली आहे.

भार्गवने जुलै 2019 मध्ये बॅंकॉक येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत 1 सुवर्ण व 4 कांस्य पदके मिळविली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.