‘रोड’पती वरून अचानक करोडपती कसे बनले रॉबर्ट वाड्रा? – संबित पात्रांचा प्रश्न  

नवी दिल्ली – मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांना आज अंलबजावणी संचालनालय (ईडी) समोर हजर राहायचे आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या कार्यालयाच्याबाहेर दोन आरोपींचे पोस्टर्स लागले आहेत. हे दोन आरोपी कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा आहेत. हे दोन्ही आरोपी जामिनावर बाहेर आहेत, अशी टीका संबित पात्रा यांनी केला आहे.

संबित पात्रा म्हणाले कि, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ५ हजार कोटींचा घोटाळा तर ६०० कोटींचा टॅक्स न भरणारे राहुल गांधी पहिले आरोपी आहेत. आणि रॉबर्ट वाड्रा यांनी मनी लाँडरिंग प्रकरणी आज ईडीसमोर हजर राहायचे आहे. दलालीच्या पैशांनी रॉबर्ट वाड्रा यांनी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. यूपीएच्या काळात पेट्रोलियम आणि संरक्षण करारांमधून वाड्रा यांना प्रचंड दलाली मिळाली. सेंटेक इंटरनॅशनल नावाची एक कंपनी वाड्रा यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या संजय भंडारी यांच्या  कंपन्यांच्या खात्यात गेली. तर एका करारातून मिळाळेला पैसा स्कायलाईट नावाच्या दुबईस्थित कंपनीच्या खात्यात गेला. याच पैशातून वाड्रा यांनी लंडनमध्ये फ्लॅट्स खरेदी केल्या आहेत. काँग्रेसने सांगायला हवे कि, रोड पती से अचानक करोडपती कसे बनले रॉबर्ट वाड्रा? त्यांच्याकडे कंपनी सुरु करण्यासाठी १ लाख रुपयेही नव्हते. अचानक कोट्यवधींचे मालक झाले, असे गंभीर आरोप त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.