रोडरोमिओंवर पोलिसांची धडक कारवाई

पिंपरी – शहर परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांबाहेर उभे राहून विद्यार्थीनींची छेडछाड करणे, तसेच बाहेरील विद्यार्थ्यांना दमदाटी करुन मारहाण करुन लुटमार करण्याच्या घटना समोर समोर आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या परिसरातील रोडरोमियोंवर कारवाईचा बडगा उगारला. महाविद्यालयाचे ओळखपत्र नसलेल्या ४२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन परिसरात अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या २४ दुचाक्या जप्त केल्या आहेत.

पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी शाळा महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन नसून देखील महाविद्यालयाच्या परिसरात आणि गेटवर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणाहून ४२ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कारवाई दरम्यान पोलिसांना तेथे २४ दुचाक्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी त्या देखील जप्त केल्या आहेत. या वाहनांचे क्रमांक पिंपरी पोलिस वाहतूक पोलिसांना पाठवणार असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर ज्याच्याकडे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांना ताकीद देण्यात येणार आहे. तसेच इतर जणांवर मुंबई कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)