“रोटरी’च्या मंडपात 53 जोडप्यांचे शुभमंगल!

  • दिग्गजांची हजेरी : अनेकांच्या मदतीने विवाह सोहळा शांततेत

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव दाभाडे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात 53 जोडप्यांची विवाहबद्ध झाली. दिमाखदार विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांनी वऱ्हाडी म्हणून हजेरी लावली.

काळाची गरज ओळखून गेली 22 वर्षे सामाजिक भान जपणारा आहे. रोटरी पासून स्फूर्ती घेवून अनेक संस्थानी असे विवाह सोहळ्याचे केलेले आहेत. रोटरीचे अध्यक्ष महेश महाजन सर्व उपस्थितांचे स्वागत करुन गेली तीन महिने या उपक्रमाठी रोटरीने शिस्तपूर्ण प्रयत्न केले याचा उल्लेख केला. उपाध्यक्ष व प्रकल्पप्रमुख रो. बाळासाहेब चव्हाण, समन्वयक रो. यादवेंद्रजी खळदे. सहसमन्वयक रो. विलास जाधव, रो विश्‍वनाथ मराठे यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

या सोहळ्यासाठी मावळ, हवेली, खेड, मुळशी, नागपूर, आमरावती, भिवंडी, पारनेर, रावेरी आदी तालुक्‍यातील वधु-वारांनी नोंदणी केली. रो. आमदार बाळा भेगडे, उपनगराध्यक्ष रो. सुनील शेळके, रो. आशोक काळोखे, रो. नामदेवराव दाभाडे. रो. धनंजय काटे, रो. विश्‍वनाथ मराठे यांनी मोठी आर्थिक मदत केली व उभी केली. तसेच सतिशजी गुप्ता मंत्रा कंस्ट्रक्‍शन, शरदजी म्हस्के व प्रवीण सोनी यांनी आर्थिक मदत केली.

या वेळी आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष रो. सुनील शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक रो. बाळासाहेब नेवाळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रो. बापुसाहेब भेगडे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सभागृह नेते सुशील सैदाने, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती निता काळोखे, नगरसेविका वैशाली दाभाडे आदी उपस्थित होते.

विवाह सोहळ्यातील 53 जोडप्यांना वरील व अनेक दानशुरांच्या व रोटरीच्या सभासदांच्या आर्थिक मदतीतून वराला सफारी, वधूला शालू, हळदीची साडी, मोत्याची माळ, टायटन सोनाटा मनगटी घड्याळ, लक्ष्मी यंत्र, संसार उपयोगी भांडी सेट, मोफत गॅस कनेक्‍शन सेट, आणि एक तोळा अंगठीचा लको ड्रा आदी भेटवस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. राजेद्र पोळ यांनी केले. तसेच रो. प्रसाद मुंगी यांनी सर्व आर्टवर्क, आकर्षक बॅनर्स, कमानी आदी जबाबदारी पार पाडली. ईनरव्हील क्‍लब अध्यक्षा संगिता जाधव, मिरा महाजन, भावना चव्हाण, निता देशपांडे, निता काळोखे, जयश्री ढम, कल्याणी मुंगी, निशा पवार, कौस्तुभ पुणे, आदी भेटवस्तूचे वाटप केले.

उत्सव सोहळा यशस्वीतेसाठी रोटरीयन्स रो. श्रीशैल मेंथे, श्रीराम ढोरे, जनार्दन ढम, रो. आनंद अस्वले, रो. अतुल हंम्पे, रो. प्रदिप खळदे, रो. देवेंद्र कदम, रो. अनिश होले, रो. लाला, रो. सूर्यकांत पुणे, रो. विष्णुपंत बच्चे, रो. विजयराव काळोखे, निलेशकुमार वाघचौरे, तसेच रो. सुहास जोशी, धनंजय मथुरे, महेंद्रसिह कक्कर, दिपकभाई शहा, अतुलजी शहा, भालचंद्र लेले, शशांक ओगलेकाका, राहुल दांडेकर, सुनील मोहरीर शिवाजी आगळे, संजय पटवा, निखील भगत, संजय शहा, अरुण बारटक्के, उद्धव चितळे, जयवंत देशापांडे, मंगेश गारोळे, काकासाहेब हलवर आदींनी मोलाची मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)