रोग रेड्याला अन्‌ औषध पखालाल्या

शिक्रापूर पोलिसांची अजब कारवाई : जुगार नसलेल्या ठिकाणी छापा

शिक्रापूर- शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत जुगाराच्या साहित्यासह एकाला ताब्यात घेतले. मात्र, या कारवाईत जखम हाताला अन्‌ उपचार पायाला, असा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आकाश विश्‍वनाथ वर्मा (रा. शिक्रापूर, बांदल कॉम्प्लेक्‍स, ता. शिरूर, मूळ रा. मरीन ड्राईव्ह ब्रिजजवळ मुंबई) यास ताब्यात घेत त्याच्याकडील बाराशे रुपये रक्‍कम जप्त केली आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एका जुगार मटका चालविणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिल्याने मटका जुगार चालविणाऱ्या एकावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना शिक्रापूर चाकण चौकातील बालाजी टॉकीजजवळ एक इसम तीन पत्ती सोरट नावाचा जुगार मटका चालवित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस हवलदार सुरेश डुकले, दत्तात्रय शिंदे, हेमंत इनामे, योगेश नागरगोजे यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्यावेळी तेथे आकाश वर्मा हा इसम काही लोकांना घेऊन तीन पत्ती सोरट नावाचा जुगार मटका चालवित असल्याचे आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून रोकड जप्त केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करत आहे.

  • बालाजी सिनेमाजवळ जुगार अड्डाच नाही
    शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच जुगार अड्डयावर कारवाई केली. मात्र, कारवाई केली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जुगार अथवा मटका नाहीच. मटका, जुगार सुरू असलेले ठिकाण वेगळेच आहे. ज्या ठिकाणी कारवाई केली तेथे नागरिक देखील उपलब्ध नसतात तर जेथे सध्या जुगार सुरू आहे. ते भर रस्त्याच्याकडेला असून तेथे कारवाई नाही. जेथे मटका, जुगार नाही. तिथे कारवाईची नौटंकी केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांची कारवाई म्हणजे जखम हाताला अन्‌ उपचार पायाला असा प्रकार उघडकीस आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.