रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धा : सहा सुवर्णपदकांसह नाशिक वॉटरस्पोर्ट अकादमी संघाचे वर्चस्व 

आरसीबीसी सब-ज्युनियर, ज्युनियर, चॅलेंजर स्प्रिंट रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धा 

पुणे – नाशिक वॉटरस्पोर्ट अकादमी संघाने विविध गटांत अव्वल क्रमांकांसह एकूण 6 सुवर्णपदके पटकावून रॉयल कनॉट बोट क्‍लबच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित आरसीबीसी चॅलेंजर स्प्रिंट रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धेवर वर्चस्व गाजविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रॉयल कनॉट बोट क्‍लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सब-ज्युनियर मुलींच्या दुहेरी स्कल गटात एनडब्लूएसएच्या सानिका तांबे व आर्या भोसले या जोडीने अव्वल क्रमांक पटकवला. सब-ज्युनियर मुलींच्या दुहेरी गटात गायत्री गलांडे व निधी भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. चॅलेंजर पुरुष कॉक्‍सलेस फोर गटात एनडब्लूएसएच्या अनिकेत तांबे, मुकेश राजगुरू, चंद्रकांत काकड, मयूर म्हसाळ यांनी सुवर्णपदक पटकावले. तर एमआयटीच्या वैभव रोकडे, योगेश देवताळे, धीरज रोकडे, पंकज गायकवाड यांनी दुसरा आणि नाशिक ऍमॅच्युअर रोईंग असोसिएशनच्या योगेश मते, सागर शिंदे, बाळासाहेब भोर, रोशन ठिकाले यांनी तिसरे स्थान पटकवले.

सब-ज्युनियर एकेरी स्कल मुलींच्या गटात सीएमईच्या कौर अविनाश हिने, तर मुलांच्या गटात विनायक टांगाय याने प्रथम क्रमांक पटकावला. सब-ज्युनियर मुलांच्या दुहेरी स्कल गटात एमआयटीच्या कृष्णा भामे व यशराज गायकवाड या जोडीने विजेतेपद पटकावले. ज्युनियर पुरुष दुहेरी स्कल गटात बीईजीच्या अंकुश ठोसरकर व आशुतोष हिरगुडे यांनी, तर ज्युनियर पुरुष एकेरी स्कल गटात केटीएचएमच्या नीलेश धोंगडे याने पहिला क्रमांक पटकावला. चॅलेंजर महिला पेअर गटात एनडब्लूसीएच्या पूनम व प्रणाली तांबे यांनी, तर चॅलेंजर महिला एकेरी स्कल गटात एनडब्लूएसएच्या जागृती शहारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सविस्तर निकाल-
सब-ज्युनियर मुली दुहेरी स्कल: 1. सानिका तांबे, आर्या भोसले, 2. सृष्टी धोंडगे, समृद्धी लहामगे; मुले दुहेरी स्कल: 1. लव सिंग, खुश सिंग, 2.अर्जुन शिंदे, दर्शन गवळी, 3. वालिद शेख, आबेद तांबोळी, 4. साहिल माळी, साहिल राऊत; सब-ज्युनियर मुली दुहेरी: 1. गायत्री गलांडे, निधी भोसले, 2. श्रुती कांबळे, साक्षी काकडे; मुली एकेरी स्कल: 1.कौर अविनाश, 2.श्वेता मोंडल; मुले एकेरी स्कल: 1. विनायक टांगाय, 2. अनिकेत कोलते;
मुले दुहेरी स्कल: 1. कृष्णा भामे,यशराज गायकवाड, 2.अर्जुन शिंदे, दर्शन गवळी; सब-ज्युनियर मुली दुहेरी स्कल: 1. अनघा पोसुगडे, प्रणाली कोपर्डे, 2.सृष्टी धोंडगे, समृद्धी लहामगे; ज्युनियर पुरुष दुहेरी स्कल: 1. अंकुश ठोसरकर, आशुतोष हिरगुडे, 2.नीलेश धोंगडे, विशाल पिंगळे, 3.क्षितिज माळी, ओंकार गवळी, 4. पवन कोळी, करण घुनाके; ज्युनियर पुरुष एकेरी स्कल: 1. नीलेश धोंगडे, 2. क्षितिज माळी, 3. राहुल राजभर, 4. कामेश मंडलिक; चॅलेंजर पुरुष कोक्‍सलेस फोर: 1.अनिकेत तांबे, मुकेश राजगुरू, चंद्रकांत काकड, मयूर म्हसाळ, 2. वैभव रोकडे, योगेश देवताळे, धीरज रोकडे, पंकज गायकवाड, 3.योगेश मते, सागर शिंदे, बाळासाहेब भोर, रोशन ठिकाले; चॅलेंजर पुरुष डबल फोर: 1.योगेश लाभाडे, सागर राऊत, 2.आकाश चव्हाण, प्रसाद जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)