रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांनी वाचवले जखमी तरुणाचे प्राण

भोर- भोर शेटे वाडी – ते पोलीस स्टेशन रस्त्यावरील एका हॉंटेलसमोर दुपारच्या रखरखीत उन्हाच्या तडाख्याने एक तरुण फिट येऊन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्‍यास, तसेच कपाळावर गंभीर जखमा होऊन तो बेशुद्ध झाला असताना त्याचे मदतीला कोणीही पुढे आले नाही.
ही घटना रेस्क्‍यू फोर्सचे सभासद असलेल्या अमित जाधव यांना कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेऊन त्या अनोळखी तरुणाची गंभीर अवस्था पाहून 108 नंबरला दुरध्वनीवरून माहिती दिली आणि त्यानंतर रेस्क्‍यू फोर्सचे सचिन देशमुख आणि अन्य त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी त्या अनोळखी जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमी तरुणावर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मन्नुर यांनी तातडीचे उपचार केल्यावर काही वेळातच हा तरुण शुद्धीवर आला. सचिन देशमुख यांनी या तरुणाची विचारपूस केली असता त्याने त्याचे नांव शंकर तुंगतकर (रा.आंबाडे, ता. भोर) असल्याचे सांगितले. रेस्क्‍यू फोर्सच्या जवानांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. या जखमी तरुणास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदार्शनाखाली पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती सचिन देशमुख यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)