रेल्वे स्टेशन, स्वारगेट बसस्थानकात मोबाईल चोर जेरबंद

पुणे- पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट बसस्थानक येथून रात्री आणि पहाटेच्या वेळेला जाणऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणाऱ्या दोघांना ऍन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून 8 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ऐवज हस्तगत केला आहे.
रोहित राजू पवार (वय 19, रा. भवानी पेठ, गवळीवाडा, कॅम्प) आणि राजू अनिल जाधव (वय 20, रा. भवानी पेठ, एडी कॅम्प चौक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शहरातील पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट तसेच शिवाजीनगर परिसरात रस्त्यावरील नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऍन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पथक तपास करीत होते. दरम्यान, प्रवाशांचे मोबाईल हिसकाविणारे दोन मुले ग्रे कलरच्या दुचाकीवर पुणे स्टेशन परिसरात येणार आहेत, अशी माहिती बुधवारी रात्री पोलीस नाईक अजय उत्तेकर, आणि पोलीस शिपाई राकेश खुणवे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्टेशनसमोरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरील दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी पुणे स्टेशन आणि स्वागरेट परिसरात रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत रस्त्याने मोबाईलवर बोलत जाणाऱ्या प्रवाशांकडील हिसकाविलेले 8 मोबाईल जप्त केले. दोघांनी याप्रकारे आणखी गुन्हे केले असल्याची शक्‍यता आहे. सहायक आयुक्त समीर शेख, पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक फौजदार राजेंद्रसिंग चव्हाण, पोलीस हवालदार सुनिल चिखले, विजय गुरव, सर्फराज शेख, किरण ठवरे, प्रविण पडवळ, कैलास साळुंखे, निलेश शिवतरे यांनी ही कारवाई केली.

चौकट…
पाचशे रूपयांत विकले मोबाईल
दारूसाठी अवघ्या पाचशे रूपयांत दोघांनी महागडे मोबाईल अवघ्या 500 ते 1 हजार उपयांना विकल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गुन्हे पंकज डहाणे यांनी दिली. प्रवास करून रेल्वेस्टेशन बसस्थानकात उतरल्यानंतर प्रवाशी नातेवाईकांना कॉल करण्यासाठी मोबाईल बाहेर काढतात. या संधीचा गैरफायदा घेत दोघांनी मोबाईल हिसकावून नेले. आरोपी राजू जाधव हा दुचाकी चालवायचा तसेच रोहित पवार हा मोबाईल हिसकाविण्याचे काम करीत असत. दोघांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी बेताची आहे. दोघांनी महागडे मोबाईल मित्रांना 500 रुपयांना विकले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)