रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात मोबाईल चोरणाऱ्या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात पाळत ठेवून प्रवाशांचे मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. दोघांना 25 जुलै ऍन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून 8 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली होती.
रोहित राजू पवार (वय 19, रा. भवानी पेठ, गवळीवाडा, कॅम्प) आणि राजु अनिल जाधव (वय 20, रा. भवानी पेठ) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी झालेल्या दोघांची नावे आहेत. शहरातील पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसरात रस्त्यावरील नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्शभूमीवर ऍन्टी गुंडा स्कॉड दक्षिण विभागाचे पथक तपास करीत होते. त्यानुसार पथकाने स्टेशनसमोरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा रचून दुचाकीवरील दोघांना अटक केली होती. दरम्यान त्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)