रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी अरूणकुमार यांची नियुक्ती

नवी दिल्ली – भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी अरूणकुमार यांची शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ते सध्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. आरपीएफचे विद्यमान महासंचालक धमेंद्रकुमार उद्या (रविवार) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागा अरूणकुमार घेतील.

ते आयपीएसच्या 1985 मधील तुकडीतील उत्तरप्रदेश केडरचे अधिकारी आहेत. अरूणकुमार 30 जूून 2021 पर्यंत आरपीएफच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळतील. त्यांनी याआधी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) सहसंचालकपदासह महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आरूषी तलवार हत्या प्रकरणासारख्या हाय-प्रोफाईल प्रकरणांच्या तपासाची सुत्रे त्यांच्याकडे होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)