रेल्वे व थिसेनक्रुप कंपनी कडून वृक्ष लागवड

पिंपरी – पिंपरी येथील मध्य रेल्वे स्टेशनच्या मार्गासमोरील कोहिनूर शांग्रीला सोसायटी ते एम्पायर इस्टेट या परिसरात थिसेनक्रुप इंडस्ट्रीज कंपनी व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

लागवड करण्यात आलेल्या वृक्षामध्ये वड, पिंपळ, चिंच, लिंब, अशोका, या 650 झाडांची वृक्ष लागवड खासदार, श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, थिसेनक्रुपचे कार्यकारी संचालक मलय दास, विवेक भाटीया, मनुष्यबळ विकास प्रमुख राजेंद्र नागेशकर, सुहास तलाठी, मध्य रेल्वेचे डिव्हीजनल मॅनेजर मिलींद देऊसकर, व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, एकनाथ पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रसंगी थिसेनक्रुप कंपनीच्या वतीने सर्व मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व एक वनस्पती रोपांचे वाटप करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन नासीरे यांनी केले तर सुत्रसंचलन निखील देसाई यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)