रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ‘सब-वे’

संग्रहित छायाचित्र

वडगाव मावळ स्थानक परिसरात काम सुरू

पुणे – पुणे-लोणावळा लोहमार्गावरील वडगाव मावळ स्थानक परिसरात “सब-वे’ अर्थात भुयारी मार्गांचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानकाशेजारील गेट क्रमांक 49 येथे हे काम सुरू करण्यात आले आहे. हा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
भुयारी मार्गाचे भूमिपूजन बुधवारी (दि.25) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील आदी उपस्थित होते. देऊस्कर म्हणाले, हा सब-वे उभारण्यासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. होणारा सब-वे पाच मीटर रुंदी, 19.50 मीटर लांबी व 3.75 मीटर उंच असणार आहे. नव्याने तयार होणाऱ्या या सब-वेमुळे नागरिकांना लोहमार्ग ओलांडने सुरक्षित होईल.

‘सब-वे’ दृष्टीक्षेपात
1.75 कोटी
रुपयांची तरतूद


5 मीटर
“सब-वे’ची रुंदी


19.50 मीटर
एकूण लांबी


3.75 मीटर
असेल उंच


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)