कुशीनगर: उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे एका शाळेच्या बसने रेल्वेला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ७ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या स्कूल व्हॅनमधून एकूण २० विद्यार्थी प्रवास करीत होते. एका रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात झाला. स्कूल व्हॅनच्या चालकाने क्रॉसिंग करताना रेल्वे येत असल्याची खात्री केली नसल्याने हा अपघात झाल्याचे कळते.
आज सकाळी ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघाताची गंभीर दखल घेतली असून गोरखपूरच्या पोलीस आयुक्तांना या अपघाताचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा