रेल्वेचा ढिसाळ कारभार – टॉयलेटमध्ये 3 दिवस सडला प्रवाशाचा मृतदेह

पाटणा (बिहार) – रेल्वे बोगीच्या टॉयलेटमध्ये एका प्रवाशाचा मृतदेह 3 दिवस सडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पटना-कोटा एक्‍स्प्रेसच्या स्लीपर बोगीमधील टॉयलेटमध्ये एका प्रवाशाचा मृतदेह तीन दिवस पड्‌ला होता आणि त्याची कोणीही दखल घेतली नाही. अखेरीस शनिवारी रात्री दोन वाजता राजेंद्रनगर टर्मिनलच्या यार्डमध्ये ट्रेन उभी राहिल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यंना माहिती दिल्यानंतर सकाळी टॉयलेटचा दरवाजा फोडून पोलीसांनी मृतदेह बाहेर काढला.

कानपूरच्या आनंदपुरी येथील व्यापारी संजय अग्रवाल गुरुवार दि. 24 मे रोजी सकाळी 6.40 वाजता कानपूरहून आग्रा येथे जायला निघाले होते. त्यांचा मृतदेह 72 तासांनंतर, रविवारी सकाळी 7 वाजता बोगीच्या टॉयलेटमधून बाहेर काढण्यात आला. त्यांचे कपडे टॉयलेटच्या दाराला अडकवलेले होते. त्यांचा मोबाईल, पैसे, तिकिट….सारे काही सुरक्षित होते. त्यांचा मृत्यू हार्ट ऍटेकने झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. परंतु त्यांचा मृतदेह तीन दिवस बोगीच्या टॉयलेटमध्ये पडून राहिला. या तीन दिवसात सफाई कर्मचारी टॉयलेट साफ करण्यासाठी आले नाहीत आणि सुरक्षा कर्मींनाही बंद टॉयलेट उघडण्याचा प्रयत्न करता आला नाही. पाटण्याहून ट्रेन कोट्याला गेली आणि 24 तास उशिरा, शनिवारी रात्री परत राजेंद्र नगर टर्मिनलला पोहचली. तोपर्यंत टॉयलेटकडे रेल्वे कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एसी कोचमध्ये जागा न मिळाल्याने संजय अग्रवाल स्लीपरव्‌ कोचने प्रवास करत होते. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचे त्यांच्या पत्नीशी शेवटचे बोलणे झाले होते. आणि आपल्याला बरे वाटत नसल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)