रेनकोटनिर्मितीतून अर्थार्जन

पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेकदा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना पावसापासून बचाव करण्यासाठी आवश्‍यक असतो तो रेनकोट. गेल्या काही वर्षांपासून रेनकोट आणि रेनसूटच्या मागणीत ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पावसाळ्यात साधारण तीने त चार महिने या रेनकोट आणि रेनसूटला मोठी मागणी असते. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर अलीकडील काळात थंडीच्या दिवसांतही विंड चीटर आणि जॅकेट सारख्या गोष्टींना मोठी मागणी आहे. बर्फाळ प्रदेशात फिरायला जाण्यासाठी देखील अनेक जण या गोष्टींची खरेदी करतात. अशा उत्पादनांच्या निर्मितीतून चांगला व्यवसाय सुरू करून अर्थार्जन करता येऊ शकते.

तयारी आणि गुंतवणूक – हा व्यावसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. तुम्ही हा व्यवसाय साधारण 50 ते 60 हजारात सुरू करू शकता. या पैशामध्ये तुम्ही कपडे आणि पॅकिंग मटेरिअल विकत घेऊ शकता. हे कपडे (पॉलिस्टर फॅब्रिक) कोलकाता अथवा मुंबई येथून मागवावे लागतात. याच्या निर्मितीसाठी तुम्ही एखादा कारागीर ठेवू शकता अथवा तुम्ही स्वतः याची शिलाई करू शकता. जर तुम्ही हे काम बाहेर करण्यासाठी दिले तर यासाठी तुम्हाला वेगळी मशीनरी घेण्याची गरज भासणार नाही. बाहेरुन माल तयार करुन तुम्ही याची विक्री करु शकता.

मार्केटिंग – रेनीवेअर्सचा वापर आज सगळीकडे केला जातो. त्यामुळे ही उत्पादने तुम्ही संपूर्ण देशात कोठेही विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला एक सप्लाय चेनची निर्मिती करावी लागेल. मालाच्या विक्रीसाठी वेग-वेगळ्या शहरांमध्ये संपर्क करावा लागेल. तेथील महत्वाची ठिकाणे शोधून त्या ठिकाणी याची विक्री करता येऊ शकेल. सुरुवातीच्या काळात काही दुकानदारांना तुमचे उत्पादन दाखवा. त्यानंतर हळूहळू व्यावसाय वाढविण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्यावसाय वेगवेगळ्या शहरात वाढवू शकता.

प्रशिक्षण गरजेचे – इतर व्यवसायांच्या तुलनेत हा व्यवसाय साचेबद्ध आहे. त्यामुळे अनुभवाशिवाय हा व्यवसाय करणे थोडेसे त्रासदायक आहे. यामध्ये कपड्याची कटिंग, त्याची शिलाई, कपडे कोठून खरेदी करायचे, याचा सप्लाय कसा होता हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यापूर्वी याचे प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते. त्यात आता जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे व्यावसाय सुरू केल्यानंतर तो जीएसटी अंतर्गत नोंदणी अवश्‍य करुन घ्या.

प्रमुख संस्था

दिल्ली स्कूल ऑफ इंटरनेट मार्केटिंग, नवी दिल्ली

इंस्टिट्यूट फॉर इंटीग्रेटेड लर्निंग इन मेॅजमेंट, दिल्ली

एसपी जैन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ डिजिटल मार्केटिंग, नागपूर

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळूरू

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर

इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, इंदूर

डिजिटल विद्या, मुंबई

इंटरनेट आणि मोबाइल एसोसिएशन ऑफ इंडिया

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)