‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून!

प्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार ‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. हे तर काहीच नाही, काही जण इतका विचार करतात कि विचारच करत राहतात. आणि काहीजण विचारही करतात आणि कृती सुद्धा करतात. पण कृती आधी करतात आणि विचार नंतर करतात अश्या भिन्न प्रवृत्तीच्या तीन व्यक्तिरेखा एकत्र आल्यानंतर जी धम्माल उडायला हवी तीच एन्जॉयमेंट हा चित्रपट देणार आहे. प्रेक्षकांची मस्त धम्माल करण्यासाठी या चित्रपटाचा फॉर्म खुसखुशीत रोमँटिक विनोदाचा असून वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या जोडीला विनोदवीर सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले अश्या हरहुन्नरी कलाकारांची साथ पोषक ठरली आहे.

‘रेडीमिक्स’ मधील चार गीतांपैकी दोन गाणी सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यात ‘ठरवून कधी मन वेडे होते का?’ हे आशिष शर्माच्या आवाजातील आणि ‘का मन हे तरंग होऊनी पाण्यावर राहते.’ हे आर्या आंबेकरच्या आवाजातील गाणं सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला एका दिवसात साडेतीन लाखांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)