रेकॉर्डिंग (ध्वनिमुद्रण) करणाऱ्या तंत्रज्ञांची लगबग सुरू

(वार्ताहर )

उत्तम संवादाची व संगीताची लयबध्द जोडणी करून दर्जेदार पध्दतीन रेकॉर्डिंग (ध्वनिमुद्रण) करणाऱ्या तंत्रज्ञांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवातील आकर्षण म्हणजे जिवंत देखावे. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयी देखावे जिल्ह्यात सादर केले जातात. चर्चेत असलेले विषय व घटना यावरती भाष्य करणारे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची मंडळांमध्ये गर्दी होत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावे याकरिता शासन तसेच विविध सामाजिक संस्था गणेश देखाव्याच्या स्पर्धाचे आयोजन करतात. यामध्ये गणेश मंडळे मोठ्या हिरीरीने सहभागी होतात. देखाव्यामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळते. काही मंडळाचे कार्यकर्ते स्वत:देखील देखाव्यामध्ये रात्र दिवस तालमी करून प्रेक्षकांपर्यत आपल्यातली सुप्त कला पोहचवण्यासाठी मेहनत घेतात. स्पर्धेच्या व प्रेक्षकांच्या कसोटीवरती यश मिळवण्यासाठी सुयोग्य विषयाची निवड, उत्तम लेखन, अभिनय, व संवाद याचे महत्व आहे. उत्तम दिग्दर्शनाचे कौशल्य, कलाकारांचा अभिनय, सुयोग्य संगीत, संवाद, वेशभुषा, भव्यदिव्य नेपथ्य, प्रेक्षकांना जागेवरती खिळवून ठेवण्याची किमया साध्य करते. या सर्वच बाबतीत कलाकारांचा कस लागतो. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते झटत असल्याचे पहायला मिळत आहे. या प्रक्रियेतील महत्वाचा भाग म्हणजे देखाव्यांचे रेकॉर्डिंग.

सातारा शहरातील मंडळांनी जिवंत देखावे सादर करण्याची अनेक वर्षाची परंपरा आजही जपली आहे. गणेशोत्सावात रेकॉर्डिग केलेल्या जिवंत देखाव्यांना पहायला गर्दी होते. यामुळे या रेकॉर्डिग करणाऱ्या तंत्रज्ञांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सातारामधील संतोष भंडारे, सागर आवळे, जतीन केंजळे, संतोष काठाळे, प्रशांत बाजी यांचे सातारा शहरात स्वतःचे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहेत. सुसज्ज असलेल्या स्टुडिओत पुणे, मुंबईच्या दर्जाचे रेकॉर्डिंग ही मंडळी माफक दरात करून देत आहेत. शासनाकडून तसेच विविध संस्थाकडून स्पर्धाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

मात्र त्या करीता बक्षिसे ही नाममात्र असतात त्यातून मंडळाच्या देखाव्याचा खर्च देखील भागत नाही. त्यामुळे या स्पर्धांमध्ये विविध मंडळाचे सहभागाचे प्रमाण कमी होत चालले आहे. जास्तीत जास्त मंडळे सहभागी कशी होतील या करिता प्रयत्न करणे आवश्‍यक बनले आहे. रवी इनामदार, प्रकाश टोपे, रवींद्र डांगे, विकास जोशी, चिंत्रा भिसे, स्नेहल दामले या व अश्‍या अनेकाच्या आवाजांना मोठ्या प्रमाणात रेकॉर्डिंग करिता मागणी आहे. उत्तम आवाज निवेदांचे कौशल्य, लयबध्द रेकॉर्डिंगमुळे देखावा किंवा त्यातील संदेश प्रेक्षकांच्या ह्रदयापर्यंत ही मंडळी कलेतून पोहचवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)