रूग्णवाहिका सेवेचा बेजबाबदार कारभार

गरोदर महिलेस न घेताच रूग्णवाहिका परत

ठोसेघर, दि. 29 (वार्ताहर)-
जळकेवाडी (वरची) परळी खोऱ्यातील दुर्गम डोंगराळ भागातील जळकेवाडी (वरची) गावातील गरोदर महिलेस 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. संबंधित महिलेला प्रसुतीपूर्व वेदना होऊ लागल्यामुळे नातेवाइकांनी रुग्णवाहिकेस फोन केला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने एक ते दीड तासात येतो म्हणून कळविले. जळकेवाडी (वरची) पर्यंत रुग्णवाहिका पोहोचत नसल्यामुळे केळवली येथे रुग्णवाहिका येऊन थांबली. जळकेवाडी ते केळवली दरम्यान असलेला रस्ता हा झाडाझुडपांचा जंगली आहे. जळकेवाडी पासून केळवली पर्यंत पोहोचण्यास जवळपास तास ते दीड तासाचा कालावधी लागतो. परंतु पावसाचे वातावरण, रस्ता बिकट त्याचबरोबर गरोदर महिलेला प्रचंड वेदना होत असल्यामुळे तिला डोलीतून घेऊन येण्यास थोडा विलंब झाला. गरोदर महिलेस केळवली येथे घेऊन आल्यानंतर पाहिले असता रुग्णवाहिका रुग्णाला न घेताच गायब झाली होती. केळवली मधील ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेमध्ये असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला थोडा वेळ थांबा रुग्ण येईलच अशी विनवणी केली परंतु भरपूर वेळ झाला आहे म्हणून संबंधितांनी रुग्णाला वाऱ्यावर सोडूनच रुग्णवाहिका परत आणली. रुग्णवाहिका परत गेल्यामुळे दुर्गम भागात कोणतेच पर्यायी दळणवळणाचे साधन नसल्यामुळे रुग्णास सह नातेवाईकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. कातवडी येथून फोन करून खासगी वाहन बोलून गरोदर महिलेचा परळी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परळी येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून प्रसूतीसाठी गरोदर महिलेस जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्या आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या नंतर परळी ते सातारा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. मात्र वेदना सहन करणाऱ्या गरोदर महिलेस होणाऱ्या बालकाच्या जीवनाचा कोणताही विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून रुग्णवाहिका परत आणणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)