रुहानींना कधीही बिनशर्त भेटण्यास तयार – डोनॉल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – डोनॉल्ड ट्रम्प यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांना कधीही बिनशर्त भेटण्याची तयारी दाखवली आहे. इटलीचे पंतप्रधान ग्युसेपी कोंते याच्यासह व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही घोषणा केली.

आपला चर्चेवर विश्‍वास आहे. जुन्या परमाणू कराराबद्दल चर्चेतून नवीन अधिक चांगला मार्ग निघत असेल, तो रुहानी यांच्यासाठी चांगला असेल, इराणसाठी चांगला असेल, अमेरिकेसाठी चांगला असेल आणि साऱ्या जगासाठीही चांगला असेल. असे रुहानी यांची कधीही बिनशर्त भेट घेण्याची तयारी दर्शवताना ट्रम्प यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यापूर्वी अमेरिकेने परमाणू करारात अगोदर सहभागी व्हावे, असे वक्तव्य इराणच्या राष्ट्रपतींचे सल्लागार हामिद अबूतेलवी यांनी केले आहे.

इराणबरोबरच्या परमाणू करारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध अधिकाधिक बिघडत चालले असून परस्परांना धमकावण्याचे प्रकार होत आहेत. ट्रम्प यांच्या रुहानी यांची भेट घेण्यास तयार असल्याच्या घोषणेपूर्वी काही तास अगोदर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेबरोबर बोलणी करण्याची शक्‍यता फेटाळून लावली होता.

इराणबरोबरच्या सन 2015 च्या करारात सहभागी असलेल्या अन्य राष्ट्रांचा विरोध डावलून अमेरिकेने इराणवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)