रिपाइंचा 2 मे रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई – मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 2 मे रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात रिपाइं कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

भिमा-कोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचणाऱ्या आरोपींना अटक झाली पाहिजे, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, त्यामुळे जर संभाजी भिडे यांचा या षडयंत्रात हात असेल तर त्यांनाही मिलिंद एकबोटेप्रमाणे अटक करा, भिमा-कोरेगाव हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून मारेकऱ्यांवर कलम 302अन्वये खुनाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, भिमा-कोरेगावप्रकरणी झालेल्या “महाराष्ट्र बंद’मधील आंदोलकांवरील खटले काढून घेण्यात यावेत, ऍट्रॉसिटी कायद्याला धक्का लागता कामा नय, ऍट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता या कायद्याचे संपूर्णसंरक्षण झालेच पाहिजे, असे आठवले म्हणाले.

तसेच ऍट्रॉसिटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासांविरुद्ध कलम 395 नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झालीच पाहिजे. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करा. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व भटक्‍या विमुक्तांच्या आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. जम्मू-काश्‍मीरमधील कठुआ, उत्तरप्रदेशमधील उन्नाव तसेच देशभरात झालेल्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.

दलित, अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे 2 मे रोजी राज्यभरातील जिल्हाअधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 2 मे रोजी मुंबईत बांद्रा येथे जिल्हाधिकारी कार्यलयावर रिपाइं मुंबई प्रदेश आणि ठाणे प्रदेश तर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्त्व रामदास आठवले स्वतः करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)