रिक्षा चालकांच्या मनमानीविरोधात आंदोलनाचा इशारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृतपणे रस्त्यावरच रिक्षा स्टॅंडची वाढ होत चालली आहे. रिक्षा चालक रस्त्यामध्येच रिक्षा उभी करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघातही होत आहेत. रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भीम संग्राम संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.

शहरात नागरिकांना सुरक्षित चालण्याकरिता पदपथ नाहीत. त्यामध्येच सेवा रस्त्यावर जागा दिसेल तिथे अनधिकृत पणे रिक्षा थांबवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. अनेकदा छोटे मोठे अपघात रस्त्यावर घडत आहेत. दापोडी पासून ते निगडी पर्यंत सेवा रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्येच अचानक रिक्षा थांबवली जात आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनधारकांना अडचणी येत आहेत. या बरोबरच शहरातील मुख्य रस्त्यावर “नो एंट्री’ असताना सुध्दा काही वाहनचालक उलट दिशेने वाहन चालवतात. शगुन चौकातून इंदिरा गांधी उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने वाहने चालवली जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एचए कंपनी समोरुन देखील चुकीच्या वाहने चालवली जात आहेत. मोरवाडी चौकातून देखील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर उलट्या दिशेने वाहने चालवली जातात. त्यामुळे योग्य दिशेने जाणाऱ्या वाहनचालकाला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. त्यामध्येच सेवा रस्त्याच्या मध्ये सिट भरण्यासाठी रिक्षा थांबवल्या जातात. त्यामुळे वाहन चालकांचा व नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर निर्माण झाला आहे. ही सर्व परिस्थिती पिंपरी पोलीस वाहतूक व निगडी पोलीस वाहतूक विभागाला माहीत असुन सुध्दा वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहे. वाहनधारक नियम धाब्यावर बसवत आहेत. त्यांच्यावर व रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारावर कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भीम संग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)