मुंबई – काही वर्षांपासून मंदीत अडकलेल्या रिऍल्टी क्षेत्रात ऊर्जितावस्था येण्याची शक्यता वाढली असल्याचे पिरॅमल फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक खुश्रुू जिनीआ यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यामुळे आम्ही विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे.
मुंबईसह आमच्या सेवा दिल्ली, नोएडा, गुडगाव, बंगळुरू आणि आता पुण्यात सुरू करण्यात आल्या आहेत. अगोदर आम्ही विकसकांना वित्त पुरवठा करीत होतो. आता घर घेणाऱ्यांनाही कर्जपुरवठा सुरू केला असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात महाग घरापेक्षा मध्यम आणि छोट्या आकाराच्या घरांना अधिक मागणी राहण्याची शक्यता आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0