रा.ना.गोडबोले ट्रस्टतर्फे दि.2 रोजी ट्रेकर्स ग्रुपना साहित्य प्रदान समारंभ

सातारा – येथील रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्टतर्फे महाबळेश्‍वर येथील सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या दोन्ही ग्रुपना दोर (रोप्स), वॉकीटॉकी, स्ट्रेचर्स आदी उपयुक्त साहित्य प्रदान केले जाणार आहे. येत्या रविवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वा. राजवाडा परिसरातील समर्थसदन मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सातारचे ज्येष्ठ संशोधक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नुकत्याच महाबळेश्‍वर नजीकच्या अंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेत अपघातग्रस्तांना निःस्वार्थी माणुसकीने मदत करणाऱ्या सह्याद्री ट्रेकर्स व महाबळेश्‍वर ट्रेकर्स या संस्थांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत करावी. या आवाहनाला संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशभरातून अनेकांचे सहाय्य लाभले. कोकणातील खेडेगावापासून ते मुंबईपर्यंतच्या शेकडो नागरिकांनी 51 रूपयापासून 15 हजार रूपयापर्यंत मदत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही मदत व निधी मिळून 2 लाख रूपयाहून अधिक रक्कम गोळा झाली. या रकमेतून या दोन्ही समुहांना रोप्स, वॉकीटॉकी, स्टेचर्स, टीशर्ट आदी साहित्य प्रदान केले जाणार आहे. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास सातारकरांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या समुहाला पाठबळ द्यावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने विश्‍वस्त अरूण गोडबोले यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)