राहूल गांधींच्या हेलिकॉप्टरला घातपात?

कॉंग्रेसचा आरोप : आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची वर्तविला शक्‍यता
नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कर्नाटक दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरशी घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढेच नाही तर कॉंग्रेसने याविरोधात कर्नाटक पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. हेलिकॉप्टरमधील बिघाडामागे आंतरराष्ट्रीय टॅम्परिंग असल्याची शंकाही कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी काल (शुक्रवार) नवी दिल्लीहून दसॉल्ट फॉकन 2000 हे हेलिकॉप्टरने हुबळीला जात होते. परंतु हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवल्याने ते हवेतच हेलकावे घेऊ लागले. हेलिकॉप्टरमध्ये राहुल गांधींसह त्यांचे निकटवर्तीय कौशल विद्यार्थीही होते. ते म्हणाले की, लॅण्डिंगच्यावेळी हेलिकॉप्टर अचानक डावीकडे झुकले आणि हेलकावे घेऊ लागले. त्याआधीही विमान हेलकावे घेत होते, असे त्यांनी सांगितले.

याबाबत कॉंग्रेस पक्षाकडून गुरुवारी कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे संबंधित वैमानिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित हेलिकॉप्टर ताब्यात घेऊन वैमानिकाची चौकशीही सुरु केली असल्याचे वृत्त आहे.

तसेच हवाई संचालनालय सूत्रांच्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर वैमानिकांनी याबाबत राहुल गांधी यांना सांगितले. प्रवासादरम्यान उद्भवलेल्या अडचणीवर मात करून हेलिकॉप्टरचे यशस्वी लॅण्डिंग केल्याने राहुल गांधी यांनी वैमानिकांचे आभारही मानले, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)