राहुल यांनी सत्तेचे दिवास्वप्न पाहणे थांबवावे – अमित शहा

जयपूर – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. आगामी निवडणुका जिंकून सत्तेवर येण्याचे दिवास्वप्न पाहणे राहुल यांनी थांबवावे, असे ते म्हणाले.

शहा राजस्थानमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. कॉंग्रेसची आणखी दयनीय स्थिती होईल असे भाकीत करताना त्यांनी दुर्बिणीतूनही त्या पक्षाला शोधणे अवघड होईल, असे म्हटले. कॉंग्रेसच्या हातात देश आणि राजस्थान दोन्हीही सुरक्षित राहणार नाही. केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभव का झाला याचे पृथक्करण राहुल यांनी करावे. केंद्राच्या किंवा राजस्थानच्या सत्तेतून कुणीच भाजपला घालवू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस पक्ष केवळ मतपेढीची चिंता करतो. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी प्रचारावेळी केवळ पक्षचिन्ह कमळाचा आणि भारतमातेचा विचार करावा. निवडणूक मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांची नसून भाजप आणि पक्षकार्यकर्त्यांची आहे, अशा शब्दांत शहा यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)