राहुल गांधी यांच्या ब्रिटन मधील सभेत खलिस्तानवाद्यांची घुसखोरी

लंडन: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ब्रिटन मधील शेवटच्या सभेत खलिस्तानवादी समर्थकांनी घुसखोरी केल्याचे आढळून आले आहे. तथापी त्यांना पोलिसांनी वेळीच घेरले आणि सभागृहाबाहेर नेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. राहुूल गांधी यांची सभा उधळून लावण्याचा त्यांचा इरादा होता असे लक्षात आले आहे.

रामदा हॉटल मधील कॉन्फरन्स हॉल मध्ये हा प्रकार घडला.तेथे ब्रिटन मधील कॉंग्रेस समर्थकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राहुल गांधी यांची वाट पहात सारे जण थांबले असतानाच अचानक हॉल मध्ये पोलिस आले आणि त्यांनी तीन पुरूष आणि एका महिला कार्यकर्तीला घेरून सभागृहाच्या बाहेर नेले. ते खलिस्तान समर्थक होते असे पोलिसांनी जाहीर केले. अत्यंत काटेकार सुरक्षा व्यवस्था असतानाही ते तेथे घुसले होते. राहुल गांधी यांची सभा उधळून लावण्याचा त्यांचा कट होता. तथापी राहुल गांधी यांचे आगमन होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना हेरून तेथून हलवल्याने अनर्थ टळला आणि त्यांची सभा सुरळीतपणे पार पडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1984 च्या शिख विरोधी दंगलींमध्ये कॉंग्रेसचा हात नव्हता असे विधान राहुल गांधी यांनी केले होते त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करणार होतो असे निदर्शकांपैकी एकाने भारतीय माध्यम प्रतिनिधींना सांगितले. या बैठकीसाठी खलिस्तान समर्थक कार्यकर्ते आल्याचे संयोजकांच्या आधीच लक्षात आल्याने त्यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले तथापी त्यांनी नकार दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. राहुल गांधी यांची सभा उधळून लावण्याचा खलिस्तानवाद्यांचा इरादा होता ही बाब व्हाटॅसऍप मेसजवरून व्हायरल झाली होती. टॉमेटो फेकून त्यांची सभा उधळून लावण्याचा त्यांचा इरादा होता असे लक्षात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)