राहुल गांधी यांचे आजपासून ‘संविधान बचाओ’ अभियान

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आजपासून ‘संविधान बचाओ’ अभियानाला सुरुवात करणार आहेत. संविधान आणि दलितांवर होणारे हल्ले हे मुद्दे राष्ट्रीय स्तरावर उचलण्याच्या उद्देशाने ‘संविधान बचाओ’ अभियान राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून हे अभियान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या अभियानाची सुरुवात आजपासून राजधानी नवी दिल्लीतील तालकटोर स्टेडिअममधून होणार आहे. या अभियानात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुशीलकुमार शिंदेदेखील सहभागी होणार आहेत.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)