राहुल गांधींनी घेतली मनोहर पर्रिकरांची भेट 

पणजी – मागील काही दिवसांपासून काँग्रेस राफेल डीलवरील कथित ऑडिओ क्लिपवरून सातत्याने माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर हल्ला चढवीत आहे. अशातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मनोहर परिकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मंगळवारपासून सुरु झाले. आजारी असून देखील मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. गोव्यात सुट्टीसाठी आलेले राहुल गांधी यांनी पर्रिकरांची भेट घेत तब्येतीची चौकशी केली. यावेळी राहुल गांधी यांनी पर्रिकरांना ‘लवकर बरे व्हा’ असे म्हणत सदिच्छा व्यक्त केली. राहुल गांधी यांनी ट्विट करत ही एक खाजगी भेट असल्याचेही म्हंटले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1090149873654018049

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)