राहुल गांधींच्या दाव्याला भाजपचा आक्षेप

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यानंतर एका ट्विटर संदेशात असा दावा केला आहे की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसायाने कर्नाटकात 300 अब्ज डॉलर्स इतके योगदान दिले आहे. त्यांच्या या दाव्याला भाजपने आक्षेप घेतला आहे.

भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांचे गणित कच्चे आहे किंवा ते खोटे बोलत आहेत. त्यांनी सांगितलेली रक्कम म्हणजे कर्नाटक सरकारच्या अंदाजपत्रकाच्या सुमारे दहा पट अधिक रक्कम आहे. ही रक्कम भारतीय रूपयांमध्ये 2 लाख 9 हजार 181 कोटी इतकी आहे. राहुल गांधी यांनी कर्नाटक राज्याने केलेल्या विकासकामांचा दावा करताना ग्राफिक्‍सच्या सहाय्याने काहीं बाबी प्रसृत केल्या आहेत त्यात त्यांनी माहिती तंत्रज्ञानातून कर्नाटकाला मिळालेल्या व्यवसायाचा हा उल्लेख केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)