राहुरी तालुक्‍यातील 388 शिक्षकांच्या बदल्या

राहूरी – या शैक्षणिक वर्षात तालुक्‍यातील जवळपास 388 शिक्षकांच्या सरळसेवा ( ऑनलाईन ) बदल्यांचे आदेश गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. बदलीपात्र शिक्षकांना नवीन नेमणूकीच्या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये मराठी माध्यामाच्या 376 तर उर्दू माध्यमाच्या 12 शिक्षकांचा समावेश आहे तर यातून विस्थापित झालेल्या तब्बल 49 शिक्षकांना पुन्हा शिक्षण खात्याच्या पोर्टलवर अर्ज दाखल करण्याचे सांगण्यात आले.
बहूचर्चित व क्‍लिष्ट असलेल्या या बदलीप्रक्रियेची अखेर चालू शैक्षणिक वर्षीत होताना दिसली. मात्र याही प्रक्रियेत काही शिक्षकांवर अन्याय झाल्याचे चित्र शिक्षकांमधून पहावयास मिळाले. सेवा ज्येष्ठतेनुसार ठिकाण न मिळणे, अर्ज व्हेरिफाय न होणै वीस ठिकाणांमधील गाव न मिळणे, गैरसोयीच्या बदल्या या कारणांमुळे तालुक्‍यातील 49 शिक्षक बदलीप्रक्रियेत विस्थापित झाले आहे. यात जवळपास 22 महिला शिक्षकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या विस्थापित शिक्षकांसाठी आणखी एक संधी दिली जाणार असून त्यांना आँनलाईन अर्ज दाखल करण्याचे निर्देश आहेत परंतू सदरची वेबसाइट उघडतच नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
तालुक्‍यातील केंद्रनिहाय बदली झालेल्या शिक्षकांची संख्या पुढीलप्रमाणे
बांबोरी – 32, सडे – 52, उंबरे – 40, देसवंडी – 20, बारागाव नांदूर – 30, ताहाराबाद – 21, कनगर – 14, गुहा – 21, देवळाली प्रवरा – 25, टाकळीमियॉं – 28, वळण – 26, भटारकरवस्ती – 23, सोनगाव – 21, म्हैसगाव – 23 तर उर्दू माध्यामांच्या वांबोरी – 3, देसवंडी – 1, बारागाव नांदूर – 2, कनगर – 1, देवळाली प्रवरा – 3, सोनगाव – 2 असे बदलीप्राप्त शिक्षकसंख्या आहे.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)