रासपच्या विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी वैभव सोनवलकर

दुधेबावी, दि. 30 (प्रतिनिधी) – दुधेबावी, ता. फलटण येथील मुळ रहिवासी व बारामती येथील वैभव बापूराव सोलनकर यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या विद्यार्थी आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. महादेवराव जानकर यांच्या सूचनेनुसार पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोलतडे व पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी ही निवड केली.
वैभव सोलनकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मुळशी येथे एक वर्ष विस्तारक म्हणून काम केले आहे. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. उज्वलताई हाके, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा, श्रद्धाताई भातंमब्रेकर, प्रदेश उपाध्यक्ष, अजित पाटील, राज्यकार्यकरिणी सदस्य, नितीन धायगुडे, सातारा जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)