Sheesh Mahal 2 : अरविंद केजरीवाल यांना लोधी इस्टेटमध्ये मिळालेल्या नव्या निवासस्थानावरून भाजप आणि आपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. भाजपने या बंगल्याला ‘शीश महाल २‘ (Sheesh Mahal 2)असे संबोधत काही फोटो प्रसिद्ध केले आहेत, तर दुसरीकडे आपने हे फोटो खोटे आणि इंटरनेटवरून डाऊनलोड केलेले असल्याचा दावा करत भाजपवर जोरदार पलटवार केला. शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी एका सादरीकरणाद्वारे (पीपीटी) केजरीवाल यांच्या निवासस्थानाचे (Sheesh Mahal 2)कथित फोटो दाखवले. “हे फोटो पाहून स्पष्ट होते की, ही पसंती एखाद्या ‘आम आदमी’ची नसून अतिश्रीमंत व्यक्तीची आहे,” असा टोला स्वराज यांनी लगावला. तसेच एका खासगी कंपनीचे नाव घेत, या बंगल्यातील आलिशान साहित्यासाठी खासगी पैसा खर्च केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपच्या या आरोपांना आपने आक्रमक प्रत्युत्तर दिले. आपच्या मुख्य प्रवक्त्या प्रियांका कक्कर यांनी भाजपचे सर्व दावे फेटाळून लावत हे फोटो बनावट असल्याचे म्हटले आहे. Sheesh Mahal 2 “भाजप सकाळपासून खोट्या माहितीचा प्रसार करत आहे. हे फोटो (Sheesh Mahal 2) इंटरनेटवरून डाऊनलोड करून ते केजरीवाल यांच्या घराचे असल्याचे भासवले जात आहे. हा केवळ आमची बदनामी करण्याचा भाजपचा कट आहे,” असे कक्कर यांनी म्हणटले. आप ने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला आव्हान दिले. “आम्ही भाजपला पंतप्रधानांचे निवासस्थान दाखवण्याचे आव्हान दिले होते, मात्र ते घाबरले असून त्यांनी घराभोवती बॅरिकेड्स लावले आहेत. ‘आप’ने आता गुजरातमध्ये धडक मारल्यामुळे भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे, म्हणूनच असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत,” असेही कक्कर म्हणाल्या.